कणकवली शहरात कराओके शो क्लासेसचा २२ जानेवारीला शुभारंभ

⚡कणकवली ता.१८-: कणकवली सारख्या एका कलानगरीत प्रथमच संगीतप्रेमी महेश काणेकर यांच्या सौजन्याने आणि स्वरांजली संगीत ग्रूप कणकवलीचे संचालक गिरीष कामत यांच्या आयोजनाखाली संदेश रावले प्रस्तुत स्वरसंदेश.. कराओके म्युझिकल शो क्लासेस लवकरच सुरू होत आहे.
या म्युझिकल शो क्लासेसचे उद्घाटन रविवार २२ जानेवारी सायं.४ वा. उमा सदन, महेश काणेकर निवासस्थान, कनकनगर येथे मान्यवरांच्या प्रमुख उपस्थितीत होत आहे. कराओके म्युझिकल शो क्लासेस चे उद्घाटन ललितलेखक, कवी महेश काणेकर यांचे हस्ते होणार असून प्रमुख अतिथी म्हणून नगरवाचनालय कणकवलीचे कार्यवाह हनिफ पिरखान उपस्थित राहणार आहेत, यावेळी प्रमुख मानवंत म्हणून संगीत क्षेत्रातील जयंत धुरी, डाॅ.सिद्धेश सकपाळ, बाळा भाट, पांडुरंग धुरी, अमृता घाडी, मांगिरीष सांबारी, डाॅ.पराग मुंडले, अर्चना बागवे आदी कलावंत उपस्थित राहणार असून या कार्यक्रमाचे सूत्रनिवेदन राजेश कदम करणार आहेत,
एखाद्या सांस्कृतिक कार्यक्रमात, अथवा लग्नसोहळा, वाढदिवस, गेटटुगेदर अशा कार्यक्रमात हिंदी-मराठी गीतांच्या सदाबहार संगीतमय मैफलीत सहभागी होण्याची सुवर्ण संधी इथल्या नवोदित गायक-गायिकांना प्रथमच मिळत आहे, तरी जिल्ह्य़ातील सर्व गायक-गायिकांनी या क्षेत्रात स्वतःचे करिअर निर्माण करण्यासाठी आणि दिग्गज गायकांकडून अचूक मार्गदर्शन, शास्त्रोक्त ज्ञान प्राप्त करून घेण्यासाठी कराओके म्युझिकल शो क्लासेसला बहुुसंख्येने सहभागी होण्याचे आवाहन आयोजकांच्या वतीने करण्यात येत आहे.

You cannot copy content of this page