सेवानिवृत्त प्रा सुनीता आजगावकर यांचे निधन

मालवण दि प्रतिनिधी

मालवण येथील स का पाटील सिंधुदुर्ग महाविद्यालयांच्या सेवानिवृत्त प्रा. सुनीता आजगांवकर यांचे दि. १६ जानेवारी २०२३ रोजी निधन झाले.

मालवण येथील श्री स का पाटील सिंधुदुर्ग महाविद्यालयाचे माजी प्रिन्सिपॉल श्री म श आजगांवकर यांच्या पत्नी सौ सुनीता आजगांवकर या सुद्धा या महाविद्यालयात मराठी विषयाच्या प्राध्यापिका म्हणून कार्यरत होत्या. जवळ जवळ २० वर्षे मालवणमध्ये दोघेही अद्यापनाचे कार्य करीत होते. हे दोघेही कॉलेजमध्ये असताना मालवणातील अनेक सामाजिक आणि कॉलेजच्या अन्य कार्यक्रमांमध्ये मन लावून सहभागी होत असत. त्यानंतर श्री आणि सौ आजगावकर मुंबईत येऊन डोंबिवली कॉलेज, एसएनडीटी मध्ये कार्यरत होते. भारत पेट्रोलियम मधील सौ स्मिता मिलिंद आजगांवकर याच्या त्या सासूबाई होत्या.

You cannot copy content of this page