मंगळवारी रात्री स्थानिक गुन्हे अन्वेषण विभागाची कारवाई
⚡सावंतवाडी ता.१८-: येथील जिमखाना परिसरात गोवा बनावटीची दारू विक्री करताना एकाला स्थानिक गुन्हे अन्वेषण विभागाने काल सायंकाळी ताब्यात घेतले. त्याच्याकडून पंधरा हजार रुपये दारूचा मुद्देमाल जप्त करण्यात आला असून त्याच्या विरोधात येथील सावंतवाडी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
