रेडी येथील रेडकर हॉस्पिटलच्या “विसावा” संकल्पनेचा 22 रोजी उद्घाटन सोहळा

केंद्रीय माजी मंत्री सुरेश प्रभू यांच्यासह उद्योजक विशाल परब येणार एकाच व्यासपीठावर

वेंगुर्ल ता.१८-:

⚡मालवण:- रेडकर हॉस्पिटल संचलित “विसावा” या नवीन संकल्पनेच्या शुभारंभानिमित्त माजी केंद्रीय मंत्री सुरेश प्रभू यांच्यासह उद्योजक विशाल परब हे एकाच व्यासपीठावर येणार आहेत. रविवार २२ जानेवारीला दुपारी ४ वाजता रेडी येथील रेडकर हॉस्पिटल व रिसर्च सेंटरमध्ये हा उद्घाटन सोहळा आयोजित करण्यात आला आहे.

यावेळी मानव साधन विकास संस्थेच्या चेअरमन सौ. उमा प्रभू, गोव्याचे आमदार डॉ. चंद्रकांत शेट्ये आदी उपस्थित राहणार आहेत. डॉ. विवेक रेडकर व सुरेश झांटये यांच्या संकल्पनेतून हा अनोखा उपक्रम राबविण्यात येत आहे. सेंटरच्या १७ व्या वर्धापन दिनाचे औचित्य साधून हा कार्यक्रम आयोजित करण्यात आला आहे. यावेळी सर्वांनी उपस्थित राहावे; असे आवाहन सेंटरच्या माध्यमातून करण्यात आले आहे.

You cannot copy content of this page