अवैध वाहतूक प्रकरणी कोल्हापूर येथील एक ताब्यात

दीड लाखावर मुद्देमाल जप्त

⚡सावंतवाडी,ता.१७: अवैध दारू वाहतूक करताना कोल्हापुरातील एकाला सातार्डा येथील चेक पोस्टवर पोलिसांनी ताब्यात घेतले. त्याच्याकडून कारसह तब्बल १ लाख ५४ हजार ८०० रुपयांचा मुद्देमाल पोलिसांनी जप्त केला आहे. अर्जुन रामा पाटील (रा. हातकणंगले-कोल्हापूर) असे संशयीताचे नाव आहे.ही कारवाई आज सकाळी पाच वाजण्याच्या समोरास करण्यात आली आहे. दरम्यान त्याच्याविरोधात येथील पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

You cannot copy content of this page