देवगड तहसीलच्या समस्या बाळासाहेब ठाकरे शिवसेनेने जिल्हाधिकारी यांच्याकडे मांडल्या

देवगड
देवगड तहसील कार्यालयातील विविध समस्या व प्रलंबित प्रश्नाबाबत बाळासाहेब ठाकरे शिवसेना या पक्षाच्या वतीने सिंधुदुर्ग जिल्हाधिकारी यांच्याकडे लेखी निवेदनाद्वारे मागणी करण्यात आली असून या निवेदनाची प्रत देवगड तहसीलदार स्वाती देसाई यांच्याकडे शिष्टमंडळाच्या वतीने सोमवारी सकाळी सादर करण्यात आली.

याप्रसंगी बाळासाहेब ठाकरे शिवसेना गटाचे तालुकाप्रमुख विलास साळस्कर अमोल लोके ,विभाग प्रमुख गणेश कीर ,राजेंद्र हरयाण, तारी सरपंच जुबेदाबी सोलकर, उपसरपंच हमजा,सोलकर राजू वरक उपस्थित होते.
या प्रमुख समस्यांमध्ये देवगड तालुक्यात प्रत्येक गावागावांमधून मागील दोन ते तीन वर्षात अनेक वारस तपास प्रकरणे सादर करण्यात आली आहेत.या प्रकरणांचा निपणारा अतिशय संथ गतीने सुरू असून अनेक कुटुंबियांच्या आवश्यक असल्याचे नोंदी प्रलंबित आहेत. वारंवार नागरिक तलाठी कार्यालय, तसेच मंडळ निरीक्षक कार्यालयात हेलपाटे मारुनही या प्रलंबित प्रकरणांचा लवकरात लवकर निपटारा करण्यात आलेला नाही .याबरोबरच तालुक्यात ठीक ठिकाणी खाजगी जमीन विक्रीचे व्यवहार यापूर्वी झालेले असून त्यांच्या नोंदी करण्याची आवश्यक प्रस्ताव सादर करण्यात आले आहेत. याबाबतच्या आवश्यक नोंदी बरेच कालावधीपासून प्रलंबित असून त्या नोंदणी बाबत तात्काळ कार्यवाही करण्यात यावी अशी मागणी या निवेदनात करण्यात आली आहे. त्याचबरोबर देवगड तालुक्यात रास्त दराच्या धान्य दुकानांमधून करण्यात येणाऱ्या धान्य पुरवठा हा गरजू कुटुंबियांना उपलब्ध करून दिला जात नाही प्राधान्याने लाभार्थी कुटुंब म्हणून गरीब कुटुंबांना फायदे मिळावी अशी मागणी अनेक कुटुंब करीत आहेत प्राधान्याने कुटुंबियांच्या बाबतीत असलेल्या निकषाच्या बाबतीत अंमलबजावणीआपल्या तालुक्यात होत नसल्याने गरजू गरीब कुटुंब प्राधान्याने कुटुंब लाभांपासून वंचित आहेत याबाबत तालुक्यातील प्रत्येक गावांमधून प्राधान्याने गावातील कुटुंबीयांचे फेर सर्व्हेक्षण करण्यात यावे व जास्तीत जास्त अधिकाधिक कुटुंबांना या रस्त्याच्या धान्याचे पुरवठा करण्यात यावा .त्याचबरोबर काही कुटुंबीयांनी नावे दाखल करणे, नावे कमी करणे, ऑनलाईन प्रक्रिया, नवीन रेशनिंग कार्ड साठी प्रस्ताव सादर केलेली असून ते देखील प्रलंबित आहेत. प्रसंगी आर्थिक अपेक्षा पूर्ण झाल्यानंतर त्या मार्गी लावल्या जातात. अशी तक्रार सर्वसामान्य नागरिकांमधून होत आहे. यात ते आपण गांभीर्याने लक्ष द्यावे तालुक्यात गौण खनिज उत्खनन हा मुख्य व्यवसाय केला जातो. या गौण खनिजा करता आवश्यक असलेल्या परवाना आपल्या कार्यालयाकडून विशिष्ट मर्यादेपर्यंत दिला जातो त्या मंजूर परवान्या पेक्षाही गौण खनिजाचे उत्खनन हे बेकायदेशीर येथे मोठ्या प्रमाणात तालुक्यात ठिकठिकाणी चालू आहे. याचा प्रत्येक यापूर्वी आपल्याला आलेला आहे. याबाबत आपण योग्य ती कार्यवाही देखील दिलेली आहे. परंतु असे असतानाही बेकायदेशीपणे गौण खनिज उतखनन केले जाते .या गौण खनिज उत्खननाबाबत आपण ज्या परिसरात हे उखनन केले जाते त्याची प्रत्यक्ष पाहणी करून वस्तूस्थिती दर्शक माहिती घेण्यात यावी त्यात बेकायदेशीर गौण खनिजाचे उत्खनन होऊन शासनाचा महसूल बुडवीला जात असेल तर घटनास्थळाचे रीतसर पंचनामे करून कायदेशीर कारवाई करण्यात यावी. तालुक्यात ठीक ठिकाणी अवैध्य वाळू उत्खनन माती उत्खनन केले जाते प्रसंगी आपल्या कार्यालयाबाबत नियुक्त पत्रमार्फत देखील संबंधित व्यवसायिकांना तपासणी बाबत अथवा अन्य माहिती व पुरली जात असल्याची माहिती असल्याची समजते. आणि यात शासनाचे आर्थिक नुकसान होत आहे. या गौण खनिज परवान्यासाठी सादर करण्यात येणारी कागदपत्रांची तपासणी व नियोजित ठिकाणी याची देखील घटनास्थळ माहिती घेण्यात यावी प्रसंगी जागा एकीकडे उत्खनन दुसरीकडे असे प्रकार देखील वाहतूक ( चिरे )याकरिता आवश्यक असणारे मंजूर परवान्यां पेक्षा अधिक प्रमाणात वाहतूक केली जाते. त्यामुळे प्रसंगी रस्त्यात वाहने रस्त्यात अडकणे, वळणावर अपघात होणे, असे प्रकार घडतात तरी या समस्यांकडे आपण जातींशी लक्ष घालून या समस्यांकडे आपण योग्य ती कारवाई करण्यात यावी अशी मागणी ही निवेदनाद्वारे करण्यात आली आहे. या निवेदनाच्या प्रती मुख्यमंत्री म्हणजे महाराष्ट्र राज्य ,महसूल मंत्री ,महाराष्ट्र राज्य यांना सादर करण्यात आले आहेत.
दरम्यान या सर्व समस्या अथवा तक्रारींकडे स्थानिक कार्यालयातील काही कर्मचारी अधिकारी वरिष्ठांचे आदेशाचे पालन न करता दुर्लक्ष केल्यास संबंधित कर्मचारी अथवा अधिकारी यांचे विरोधात तीव्र आंदोलन छेडण्यात येईल असा इशारा बाळासाहेब ठाकरे शिवसेना गटाचे प्रमुख विलास साळसकर यांनी दिला आहे.

You cannot copy content of this page