मल्टीस्पेशालिटी हॉस्पिटल शहरात होण्यासाठी आग्रही;शिक्षणमंत्री दीपक केसरकर
सावंतवाडी ता.१६-:* रत्नसिंधू योजनेतून सिंधुदुर्ग व रत्नागिरी जिल्ह्याचा कायापालट करण्याची ताकद असून येत्या काही काळात जिल्ह्याचा कायापालट झालेला दिसेल. तर होऊ घातलेले मल्टी स्पेशालिस्ट हॉस्पिटल सुविधांच्या दृष्टीने शहरातच व्हावे यासाठी आपण आग्रही असल्याची माहिती राज्याचे शालेय शिक्षण मंत्री दीपक केसरकर यांनी आज येथे दिली.
