मुंबईत पंतप्रधानांच्या हस्ते. विविध प्रकल्पांची होणार उद्घाटने

१९ रोजी नरेंद्र मोदी मुंबईत;मुंबईचे पालकमंत्री दीपक केसरकर यांची माहिती

सावंतवाडी ता.१६-: पंतप्रधान नरेंद्र मोदी हे १९ जानेवारीला मुंबई दौर्‍यावर आहेत. यावेळी मोदी यांच्या हस्ते विविध प्रकल्पाचे उद्घाटन होणार असल्याची माहिती शालेय शिक्षण मंत्री तथा मुंबई शहर पालकमंत्री दिपक केसरकर यांनी आज सावंतवाडी येथे दिली.

मुंबईचा कायापालट करण्यासाठी मुख्यमंत्री व उपमुख्यमंत्री यांनी निर्णय घेतल्याने आता मुंबईचा चेहरा मोहरा बदलणार आहेत. मुंबईला गत वैभव प्राप्त करून देण्याचा आमचा प्रयत्न असल्याचे श्री केसरकर बोलताना म्हणाले. ते आज सिंधुदुर्ग जिल्हा दौऱ्यावर असताना ते सावंतवाडी येथील आयोजित पत्रकार परिषदेत बोलत होते.

You cannot copy content of this page