उप प्रादेशिक परिवहन अधिकारी नंदकिशोर काळे;सावंतवाडीत रस्ता सुरक्षा मोहिमेला मोठा प्रतिसाद
⚡सावंतवाडी ता.१६-: हेल्मेटचे महत्व महिलांना समजलं पाहिजे. तसेच लोकांनी हेल्मेटचा वापर करून स्वतःचा जीव वाचवावा, या उद्देशाने “रस्ता सुरक्षा अभियानाचे” आयोजन करण्यात आल्याची माहिती उप प्रादेशिक परिवहन कार्यालयाचे अधिकारी नंदकिशोर काळे यांनी आज येथे दिली. या अभियानाच्या शुभारंभ श्री काळे यांच्या हस्ते श्रीफळ वाढवून करण्यात आला.
यावेळी शहरात रस्ता सुरक्षा अभियानाची रॅली देखील काढण्यात आली. दरम्यान या रॅलीला महिलांचा देखील उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला. हे अभियान उपप्रादेशिक परिवहन कार्यालय, पोलीस विभाग, सार्वजनिक बांधकाम विभाग आणि महामार्ग पोलीस यांच्या संयुक्त विद्यमानाने आज सावंतवाडीत राबवण्यात आले.
यावेळी सावंतवाडी पोलीस निरीक्षक फुलचंद्र मेगडे अधिकारी विजयकुमार अल्लम्मावार . अधिकारी जावेद शिखलगार सचिन पोलादे,अभिजीत शिरगावकर, सुनील खंदारे,गणेश जाधव,प्रकाश गावडे,संदीप चव्हाण, सुनील नाईक, राजा राणे,वाहतूक पोलीस अभयकुमार मापसेकर, विल्सन,रुपेश रसाळ,आगा,जगदीश, राहुल राठोड, सुधीर पराडकर, गवंढळकर, नाईक,तावडे,धर्मेंद्र, सावंत,महादेव बामणे, रोटरी क्लब अध्यक्ष विनया बाड, भागवत ,प्रमोद आदी उपस्थित
