भाजप – शिंदे गटात गैरसमज असतील तर ते मिटवू

शिक्षणमंत्री दीपक केसरकर
कोकणात बाळासाहेबांची शिवसेना अग्रेसर

⚡सावंतवाडी ता.१६-: बाळासाहेबांची शिवसेना ही कोकणात नेहमीच आघाडीवर राहिली आहे. तसेच मुंबईसारखी जबाबदारी ही माझ्याकडे दिली आहे. त्यामुळे कुठेही आमच्या पदाधिकारी व भाजपच्या पदाधिकाऱ्यांमध्ये काही गैरसमज झाले असतील तर ते आम्ही एकत्र बसून दूर करू, अशी माहिती राज्याचे शालेय शिक्षण मंत्री दीपक केसरकर यांनी आज येथे दिली.

दरम्यान काल शिंदे गटाच्या पदाधिकाऱ्यांनी पत्रकार परिषद घेऊन भाजपने आम्हाला विचारात घेत नसल्याचं सांगितले होते यावर मंत्री केसरकर यांनी आज भाष्य केले.

You cannot copy content of this page