⚡कणकवली ता.१३-: सिंधुदुर्ग शिक्षण प्रसारक मंडळाचे कॉलेज ऑफ इंजीनियरिंग येथे स्वामी विवेकानंदांची जयंती म्हणजेच राष्ट्रीय युवा दिन व राजमाता जिजाऊ जयंती दिन साजरा करण्यात आले. यावर्षी राष्ट्रीय युवा दिनाची थीम विकसित युवा- विकसित भारत अशी आहे.
राष्ट्रीय विज्ञान राष्ट्रीय युवा दिन हा वेगवेगळ्या शाळा कॉलेजेसमध्ये उत्साहाने साजरा करण्यात येतो की ज्या ठिकाणी विद्यार्थ्यांना विद्यार्थ्यांच्या कलागुणांना वाव देण्यासाठी त्यांना निबंध स्पर्धा वक्तृत्व स्पर्धा फोटोग्राफी सिंगिंग आणि अशा प्रकारचे विविध कला गुण अविष्कारांच्या संधी उपलब्ध करून दिल्या जातात व या स्पर्धांमध्ये भाग घेण्यासाठी त्यांना उद्युक्त केले जाते.
स्वामी विवेकानंदांच्या विचारांप्रमाणे “एज्युकेशन इज दि मॅनिफेस्टेशन ऑफ द परफेक्शन ऑलरेडी प्रेझेंट इन ह्यूमन”
विद्यार्थ्यांच्या कला गुणांना वाव मिळण्यासाठी प्रथम वर्ष अभियांत्रिकी च्या माध्यमातून कलाविष्काराचे आयोजन करण्यात आले. महाविद्यालयाचे प्राचार्य व प्रमुख पाहुणे डॉ.अनिश गांगल व ऍडमिनिस्ट्रेटिव्ह ऑफिसर शांतेश रावराणे यांच्या हस्ते कलाविष्कारचे उद्घाटन करण्यात आले.
कु. ओमकार पाटील या विद्यार्थ्याने स्वामी विवेकानंद यांचे कार्य व पूर्ण जीवनपटाचे सादरीकरण करण्यात आले .त्याच प्रमाणे
गायन , वादन ,व्यक्तिगत नृत्य, सामूहिक नृत्य याचा मनमुराद आनंद ही विद्यार्थ्यांनी यावेळी लुटला.कलाविष्कारमध्ये विद्यार्थ्यांनी काढलेल्या चित्रांच ,छायाचित्रांचे
प्रदर्शन प्रेक्षागृहामध्ये करण्यात आले होते.तसेच एच एस सी २०२२व व सीईटी सीईटी २०२२ मध्ये कॉलेजमधून प्रथम आलेल्या समृद्धी गुरुदेव ढोके या विद्यार्थिनीचा सत्कार करण्यात आला समारंभाच्या शेवटी सर्वांना अल्पोहारचे वाटप करण्यात आले.
महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. अनिश गांगल ,शांतेश रावराणे यांच्या मार्गदर्शनाखाली कार्यक्रमाचे संयोजन केले होते. प्रथम वर्ष विभाग प्रमुख डॉ. शुभांगी माने यांनी विद्यार्थ्यांना सहकार्य केले,
कार्यक्रमाच्या आयोजन कमिटीमध्ये मुख्यत्वे प्रथम वर्ष विद्यार्थी प्रतिनिधी अस्जद बेग, विष्णू एजरे,आर्या पोर्येकर व प्रथमेश भिके व यांनी काम पाहिले.
या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्रथम वर्ष विद्यार्थी खुशबू मुलाणी ,वैभवी गिरकर, वरूण कर्ले , वैष्णवी घारे यांनी केले.
कार्यक्रमाचे आभार प्रदर्शन कु. कोमल कदम व अनिकेत आरेकर यांनी मांडले.
