प्रवीण उर्फ गोट्या नाईक यांचे निधन_
*💫बांदा दि.११-:* गणेश मूर्त्यांना रूप देणारा, हार्मोनियम वाजवत भजन गायन करणारा, इलेक्ट्रॉनिक्स वस्तू हाताळणारा अवलिया कलाकार प्रवीण उर्फ गोट्या गंगाराम नाईक(28, पाडलोस-केणीवाडा) यांचे काल बुधवारी रात्री 8.30 वाजताच्या सुमारास दुःखद निधन झाले. त्यांच्यावर गोवा बांबोळी येथे उपचार सुरू होते. गोट्या नाईक यांचा गणेश मूर्ती बनविण्यात हातखंड होता. तसेच गणेशोत्सवात गावामध्ये स्वतः हार्मोनियम वाजवत भजन करण्याची त्यांची वेगळी शैली होती. सर्वांच्या सुख दुःखात ते सहभागी व्हायचे. त्यांच्या जाण्याने पाडलोस गावावर शोककळा पसरली आहे. त्यांच्या पश्चात वडील, आई, भाऊ, दोन बहिणी, पुतणी, पुतणे असा मोठा परिवार आहे. सामाजिक कार्यकर्ते गणपत नाईक यांचे ते भाऊ तर पत्रकार विश्वनाथ नाईक यांचे चुलतभाऊ होत.
