*जिल्ह्यातील ७० पैकी ४८ ग्रामपंचायतीवर सरपंच व उपसरपंच भाजपचे विराजमान

*जिल्हाध्यक्ष राजन तेली यांची पत्रकार परिषदेत माहिती*

*💫सावंतवाडी दि.११-:* जिल्ह्यातील ७० ग्रामपंचायत पैकी ४८ ग्रामपंचायतीवर भाजपचे सरपंच व उपसरपंच विराजमान झाले आहेत. तसेच अजुन काही गाव पॅनेल देखील संपर्कात असून ही संख्या आणखी वाढण्याची शक्यता आहे. अशी माहिती भाजप जिल्हाध्यक्ष राजन तेली यांनी पत्रकार परिषदेत दिली आहे. तसेच ते यावेळी म्हणाले की, जनतेचा विश्वास हा भाजप पक्ष्यावर विश्वास असल्याचे सिद्ध झाले असून, त्यामुळेच आज भाजपला जिल्हात यश आले असल्याचे भाजप जिल्हाध्यक्ष राजन तेली यांनी सावंतवाडी येथे आयोजित पत्रकार परिषदेत सांगितले आहे.

यावेळी नगराध्यक्ष संजू परब, अतुल काळसेकर, आरोग्य सभापती तथा नगरसेवक सुधीर आडीवरेकर आदी उपस्थित होते

You cannot copy content of this page