जखमी अवस्थेत पडलेला युवकाला शब्बीर मणियार यांनी सावंतवाडी उपजिल्हा रुग्णालयात केले दाखल..

⚡सावंतवाडी ता.१२-: येथील सावंतवाडी आंबोली रोडवर कचरा डेपो नजिक जखमी अवस्थेत पडलेल्या आकेरी येथील रोशन सदाशिव नाईक या युवकाला सामाजिक कार्यकर्ते व शिवसैनिक शब्बीर मणियार यांनी 108 रुग्णवाहीकेतून येथील उपजिल्हा रुग्णालयात उपचारा करीता दाखल केले.

रोशन हा सावंतवाडीत इलेक्ट्रिशनचे काम करतो तो सांगेली येथे जात असतांना सावंतवाडी नगरपालिकेच्या कचरा डेपो नजीक तो दुचाकीसह पडला यात त्याला गंभीर कापत झाली रस्त्याच्या कडेला तो जखमी अवस्थेत निपचित पडला असताना तेथून सावंतवाडीला येणारे सामाजिक कार्यकर्ते शब्बीर मणियार यांच्या नजरेस तो आला त्यांनी तात्काळ 108 रुग्णवाहिकेला याबाबत कळवले शिवाय तिथे असलेले सामाजिक कार्यकर्ते महेश पांचाळ व अब्दुल रहमान यांच्या मदतीने त्याला रुग्णवाहिकेतून येथील उपजिल्हा रुग्णालयात उपचाराकरता दाखल केले याबाबतची माहिती आणि त्याच्या वडिलांना देण्यात आली असून त्याच्यावर येथील पहिला रुग्णालयात उपचार सुरू आहेत

You cannot copy content of this page