वेतोरे हायस्कूलच्या तीन विद्यार्थ्यांना शिष्यवृत्ती

वेंगुर्ला ता.१०- सन २०२१-२२ मध्ये घेतलेल्या पूर्व माध्यमिक शिष्यवृत्ती परीक्षेत वेतोरे येथील सातेरी हायस्कूलमधील मयुरी महेश गावडे, जाई सुदेश धुरी व साक्षी संजय गावडे हे तीन विद्यार्थी ग्रामीण सर्वसाधारण शिष्यवृत्तीधारक ठरले.

या विद्यार्थ्यांना मुख्याध्यापक संजय परब, पी.बी.वगरे, एस.एम.नाईक, पी.पी.पालव यांचे मार्गदर्शन लाभले. शिष्यवृत्तीधारक विद्यार्थ्यांना संस्था पदाधिकारी, मुख्याध्यापक यांनी अभिनंदन केले. सहाय्यक शिक्षिका डी.एम. प्रभू यांनी विद्यार्थ्यांना रोख रक्कम देऊन गौरव केला.

You cannot copy content of this page