पाठांतरमध्ये ज्ञानेश्वर तर वक्तृत्वमध्ये अदिती, अलिशा, निर्जरा प्रथम

⚡वेंगुर्ला ता.१०-: वेताळ प्रतिष्ठान यांनी तुळस येथील श्री शिवाजी हायस्कूल येथील जैतिराश्रीत संस्थेच्या कर्मयोगी रामभाऊ तुळसकर सभागृहात विविध गटांत जिल्हास्तरीय वक्तृत्व व पाठांतर स्पर्धा घेण्यात आली. यात ज्ञानेश्वर तांडेल, अदिती चव्हाण, अलिशा पाटकर व निर्जरा पाटील यांनी विविध गटांत प्रथम क्रमांक पटकाविला.
गणपती स्तोत्र पाठांतर स्पर्धेत जिल्ह्यातील पहिली ते चौथी इयत्तेतील एकूण ३६ स्पर्धक सहभागी झाले होते. यात ज्ञानेश्वर तांडेल (वेताळ विद्या.तुळस), भार्गवी यादव (वेंगुर्ला नं.१), तनिषा केळुसकर (वेंगुर्ला नं.१) यांनी अनुक्रमे प्रथम तीन तर राही मोबारकर (एम.आर.देसाई, वेंगुर्ला) व देवेश नवार (भेंडमळा) यांनी उत्तेजनार्थ क्रमांक पटकाविला. शालेय गट इयत्ता सातवीपर्यंतच्या विद्यार्थ्यांसाठी ‘गुरु ईश्वर तात माय‘ यावर घेतलेल्या पाठांतर स्पर्धेत १८ जण सहभागी झाले होते. यात अदिती चव्हाण (एम.आर.देसाई-वेंगुर्ला), यज्ञेश शिदे (नेमळे हायस्कूल), शमिका शिदे (नेमळे हायस्कूल) यांनी अनुक्रमे तीन तर अक्षरा शिरोडकर (मातोंड हायस्कूल) व अनुष्का शिगाडे (मोचेमाड) यांनी उत्तेजनार्थ क्रमांक पटकाविला. आठवी ते दहावीच्या विद्यार्थ्यांसाठी ‘अनाथांची माय-सिधुताई सपकाळ‘ यावर घेतलेल्या पाठांतर स्पर्धेत अलिशा पाटकर (कुडाळ हायस्कूल), श्रावणी आरावंदेकर (कुडाळ हायस्कूल), श्रद्धा नेमण (मातोंड हायस्कूल) यांनी अनुक्रमे तीन तर युक्ता तांडेल (सरस्वती विद्यालय-आरवली) व सानिका राऊळ (नेमळे हायस्कूल) यांनी उत्तेजनार्थ क्रमांक पटकाविला. खुल्या गटासाठी सध्याच्या राजकिय परिस्थितीवर भाष्य करण्यासाठी ‘लोकशाहीचे वस्त्रहरण होत आहे का?‘ यावर घेतलेल्या पाठांतर स्पर्धेत ८४ स्पर्धकांनी सहभाग घेतला. यात निर्जरा पाटील (वेंगुर्ला), अंकिता नाईक (सावंतवाडी), कुणाल कानडे (कुडाळ) यांनी अनुक्रमे तीन तर कृपा म्हाडदळकर व श्रुती शेवडे (वेंगुर्ला) यांनी उत्तेजनार्थ क्रमांक पटकाविला. स्पर्धेचे परिक्षण अजित राऊळ, प्रा.वैभव खानोलकर, बी.टी.खडपकर, सीमा परब-सावंत यांनी केले.
स्पर्धेचे उद्घाटन वाचनालयाचे अध्यक्ष सगुण माळकर यांच्या हस्ते झाले. यावेळी मुख्याध्यापक रामकृष्ण देसाई, महेश राऊळ, सुधीर चुडजी, मंगेश सावंत, गुरुदास तिरोडकर, कुंदा सावंत, अक्षता गावडे, सायली माळकर, प्रांजल सावंत, निखिल ढोले आदी उपस्थित होते.

You cannot copy content of this page