⚡मालवण ता.०९-: सांगली येथे झालेल्या विभागीय शुटिंग बॉल स्पर्धेत त्रिंबक हायस्कूलने द्वितीय क्रमांक पटकावला
सांगली कवठे महंकाळ येथे पडलेल्या १७ व १९ वर्षा खालील मुले – मुली विभागीय शुटिंग बॉल स्पर्धेत सांगली, सातारा, कोल्हापूर, रत्नागिरी व सिंधुदुर्ग या पाच जिल्ह्यांतील विजयी संघ सहभागी झाले होते यामध्ये १७ वर्षोखालील मुलांच्या गटात सिंधुदुर्गचे नेतृत्व जनता विद्यामंदिर त्रिंबक प्रशालेच्या विद्यार्थ्यांनी केले होते. सांगली संघाबरोबर अंतिम सामना अटीतटीचा होऊन त्रिंबक संघाचा थोडक्यात पराभव होऊन संघाला द्वितीय क्रमांक प्राप्त झाला. या संघात कौस्तुभ सकपाळ(कॅप्टन) शुभम लब्दे, सोहम चिंदरकर, हर्षद मेस्त्री, शुभम गावडे व हर्ष घाडीगावकर हे खेळाडू सहभागी झाले होते.
विजयी संघातील सर्व खेळाडूंचे व त्यांना मार्गदर्शन करणारे क्रिडा शिक्षक श्री महेंद्र वारंग यांचे माध्यमिक शिक्षण समिती अध्यक्ष अण्णा ( सुरेंद्र) सकपाळ सर्व संचालक मंडळ, मुख्याध्यापक सन्माननीय श्री प्रवीण घाडीगावकर सर्व शिक्षक, पालक, ग्रामस्थ यांनी अभिनंदन केले. संस्था अध्यक्ष सन्माननीय श्री अण्णा सकपाळ व त्रिंबक पोलिस पाटील सीताराम सकपाळ यांची सांगली येथे संघ नेण्यासाठी फार मदत झाली
