⚡कणकवली ता.०८-: स्पोर्टस् फाउंडेशन सिंधुदुर्ग , किर्लोस व सिंधुदुर्ग जिल्हा अम्यूचेअर ॲथलेटीक्स् असोसिएशन यांच्या सलग्नतेने आयोजित जिल्हा्स्तरीय आंतरशालेय व ज्युनियर कॉलेज ॲथलेटीक्स् चॅम्पियनशिप स्पर्धा त्रिमूर्ती माध्यमिक विद्यालय शिरवंडे येथे घेण्यात आले होते .
या स्पर्धेमध्ये शेठ. न.म विद्यालय खारेपाटण या शाळेतील साहिल सुनिल शेंगाळे याने १४ वर्षाखालील मुलांच्या गटात लांब उडीमध्ये द्वितीय क्रमांक मिळवून रौप्य पदक तसेच गोळा फेकमध्ये सुवर्ण पदक मिळवले. आणि १०० मीटर धावणेमध्ये रौप्य पदक प्राप्त केले.तसेच माधवी सुनिल शेंगाळे हीने १०० मीटर धावणे २०० मीटर धावणे व तसेच लांब उडी मध्ये सुवर्ण पदक मिळवले. व त्याच प्रमाणे वैयक्तिक चॅम्पीयनशिप चषक भूषवले.
या क्रीडा स्पर्धेत आयोजक अध्यक्ष बाळकृष्ण अनाजी कदम यांनी स्पर्धा आयोजनात सहकार्य केले . तसेच या स्पर्धेेकरिता मार्गदर्शक सह.सचिव सिंधदुर्ग जिल्हा ॲथलेटीक्स् ॲमेच्युअर असोसिएशन समीर जयवंत राऊत, श्री फोंडकण देवी स्पोर्टस् अकॅडमी ,निरोमचे संस्थापक व अध्यक्ष तसेच महिला तालुका मार्गदर्शन कु.अंजली जयसिंग गायकवाड तसेच शाळेचे मुख्याध्यापक संजय सानप, क्रीडा शिक्षक पाडवी तसेच सौ. सुप्रिया सुनिल शेंगाळे व सुनिल शेंगाळे यांच्या प्रोत्साहनामुळे त्यांनी यश संपादन केले.
