कणकवली येथील प्रशांत वनस्कर यांचा बाळासाहेबांची शिवसेना पक्षात प्रवेश

⚡कणकवली ता.०८-: युवासेना जिल्हाप्रमुख सुशांत नाईक यांचे निकटवर्तीय असलेले कणकवली येथील कार्यकर्ते प्रशांत वनस्कर यांनी सिंधुरत्न योजनेचे सदस्य किरण उर्फ भैयाशेठ सामंत यांच्या प्रमुख उपस्थितीत बाळासाहेबांची शिवसेना पक्षात प्रवेश केला.

सिंधुरत्न योजनेचे सदस्य किरण उर्फ भैयाशेठ सामंत यांच्या वाढदिवसानिमित्त उपजिल्हाप्रमुख महिंद्र सावंत, कणकवली तालुकाप्रमुख भूषण परुळेकर यांनी प्रशांत वनस्कर यांचा प्रवेश घडविला. यावेळी जिल्हाप्रमुख संजय आंग्रे ,कणकवली तालुका समन्वयक सुनील पारकर , तालुकाप्रमुख भूषण परुळेकर महेंद्र सावंत ,महेश राणे, सुनील हरमलकर आदी उपस्थित होते.

You cannot copy content of this page