मोडी लिपी कार्यशाळा भरवून सन २०२३ चे केले आगळेवेगळे स्वागत

⚡कणकवली ता.०८-: रयत शिक्षण संस्थेच्या यशवंतराव चव्हाण विद्यालय, आचिर्णे येथे नव वर्षाच्या सुरुवातीलाच “मोडीलिपी कार्यशाळा” भरवत स्न २०२३ रोजीचे आगळे वेगळे स्वागत करण्यात आले.
या कार्यशाळेचे नियोजन आचिर्णे गावचे उद्योजक पंडितराव रावराणे यांच्या संकल्पनेतून विद्यालयाचे शिक्षक संजय तुळसकर आणि इतर शिक्षकांनी केले. याच विद्यालयातील माजी विद्यार्थी मुबई येथील मोडीलिपी प्रशिक्षक
ॲड. विलास बी. कडू यांनी ही कार्यशाळा घेतली. या विद्यालयातील विद्यार्थी, शिक्षकवर्ग, कर्मचारीवृंद, पंचक्रोशितील मान्यवर, जेष्ट नागरिक आणि नागरिक इतर मोडीलिपी प्रेमींनी मूळ मोडीलिपी पाठ गिरवले आणि मोडीलिपी लेखन करुन पाठ वाचनही केले. मोडीलिपी शिकताना आणि लेखन करताना एक वेगळी लिपी म्हणजे मोडीलिपीचा आनंद घेतला. मोडीलिपी प्रशिक्षक
ॲड. विलास बी. कडू यांचे सहकारी मोडीलिपी अभ्यासक हिरबा सावंत यांचे सहकार्य लाभले. अशाप्रकारे सर्व विद्यालये व महाविद्यालये ठिकाणी मोडीलिपी कार्यशाळा भरवून मोडीलिपीचे अस्तित्व टिकवून मोडीलिपी वापरात आली पाहिजे असे मत विद्यालयाचे मुख्याध्यापक श्री कारेकर यांनी व्यक्त केले.

You cannot copy content of this page