⚡सावंतवाडी ता.०८सहदेव राऊळ -: मळगाव येथील मळगाव इंग्लिश स्कुल , मळगाव प्रशालेचा ६२ वा वार्षिक पारितोषिक वितरण समारंभ व स्नेहसंमेलन मंगळवार १० जानेवारी रोजी सकाळी १०.३० प्रशाळेच्या वा. भ. कांबळी स्मारक रंगमंच व अँड जिवाजी नारायण पाडगावकर सभागृहात वाजता आयोजित करण्यात आले आहे.
कार्यक्रमांतर्गत सकाळी ईशस्तवन, स्वागतगीत, पाहुण्यांची ओळख व स्वागत प्रास्ताविक, अहवाल व संदेश वाचन, गुणी विद्यार्थ्यांचा सत्कार, पारितोषिक वितरण, मान्यवरांची भाषणे व आभार प्रदर्शन होणार आहे. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी मळगाव ऐक्यवर्धक संघ, मुंबईचे सचिव आर. आर. राऊळ तर प्रमुख अतिथी म्हणून म्हापसा गोवा येथील उद्योजक अशोक झारापकर, शाळा समिती चेअरमन मनोहर राऊळ उपस्थित राहणार आहेत. सायंकाळी ६.३०वाजल्यापासून स्नेहसंमेलनास सुरुवात होणार आहे. यावेळी विद्यार्थ्यांचे विविध गुणदर्शन कार्यक्रम होणार आहेत. या सर्व कार्यक्रमाला व स्नेहसंमेलनास पालक व ग्रामस्थांनी उपस्थित रहावे, असे आवाहन शाळेचे मुख्याध्यापक एम. बी. फाले, सांस्कृतिक विभागप्रमुख ऋतुजा सावंत भोसले, शालेय सांस्कृतिकमंत्री सिया नाटेकर, शालेय मुख्यमंत्री दिया वायंगणकर यांनी केले आहे
