राणेंच्या संकल्पनेतील पर्यटनातून आर्थिक समृद्धी साधण्यासाठीच पर्यटन महोत्सव: समीर नलावडे

⚡कणकवली ता.०६-: सिंधुदुर्ग जिल्ह्यातील पर्यटन हे अजून विकसनशील होण्यासाठी केंद्रीय मंत्री नारायण राणे, माजी खास. निलेश राणे, आम. नितेश राणे हे प्रयत्न करत आहेत. देश – विदेशातील पर्यटक आपल्या जिल्ह्यात आले पाहिजेत . आपल्या पर्यटन सौदर्यातील नटलेले डोंगर त्यांनी पाहिले पाहिजे, हा हेतू ठेवून केंद्रीय मंत्री नारायण राणे यांनी हा जिल्हा पर्यटन जिल्हा म्हणून घोषित केला होता.राणेंच्या संकल्पनेतील पर्यटनातून आर्थिक समृद्धी साधण्यासाठीच पर्यटन महोत्सव आम्ही आयोजित करत असल्याचे नगराध्यक्ष समीर नलावडे यांनी सांगितले.

कणकवली पर्यटन महोत्सवाची दिमाखात सुरुवात झाली आहे.जल्लोषी कार्यक्रमाची रेलचेल आहे. नगराध्यक्ष समीर नलावडे म्हणाले,मालवणमध्ये एवढे पर्यटक येतात की गेल्यावर्षी साडे आठ लाख पर्यटक मालवण,तारकर्ली या पट्ट्यामध्ये आले होते. हळुहळु हे पर्यटक देवगड मध्ये देखील जातील कारण, आम. नितेश राणेंनी तेथील पर्यटन विकसनशील करून देशाच्या कानाकोपऱ्यात नेण्यासाठी प्रयत्न केले आहेत. महोत्सवातील फूड फेस्टिव्हलला सिंधुदुर्ग जिल्ह्यातील व्यवसायिकांसाठी महत्वाचे स्थान दिले आहे. आणि या माध्यमातून आपण त्यांना रोजगार उपलब्ध करून दिला. त्याचप्रमाणे या महोत्सवयाच्या माध्यमातून अनेक तरुणांनी जिद्द ठेऊन आपले रोजगार देखील सुरू केले, तसेच कणकवलीतील तरुण पिढीला योग्य मार्गावर आणण्याचे कामही आम्ही करत आहे .

फोटो
कणकवली पर्यटन महोत्सव शुभारंभ प्रसंगी बोलताना नगराध्यक्ष समीर नलावडे

You cannot copy content of this page