Headlines

महिलांच्या प्रसूतीची पिकअप ‘बिनकामाची’

हरी खोबरेकर यांचा आरोप ; जि.प. आरोग्य समितीची मासिक सर्वसाधारण सभा

सिंधूदुर्गनगरी ता १० जिल्ह्यातील शासकीय रुग्णालयांमध्ये प्रसूतीसाठी येणाऱ्या महीलां साठी पिकअप अँड ड्रॉप (ने आण) करण्याची शासनामार्फत सुविधा असतानाही ही सुविधा महिलांना दिली जात नाही. त्यामुळे त्या महिलांना घरी जाण्यासाठी आर्थिक भुर्दंड सहन करावा लागत असल्याचा आरोप सदस्य हरी खोबरेकर यांनी सभेत केला. तसेच याबाबत सभेत नाराजी व्यक्त करत सभागृहाचे लक्ष वेधले. जि.प. आरोग्य समितीची मासिक सर्वसाधारण सभा येथील बॅ. नाथ पै समिती सभागृहात सभापती सावी लोके यांच्या अध्यक्षतेखाली संपन्न झाली. यावेळी समिती सचिव तथा जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ महेश खलीपे, समिती सदस्य उन्नती धुरी, शर्वाणि गावकर, नूतन आईर, हरी खोबरेकर, लॉरेन्स मान्येकर, राजेश काविटकर, तालुका आरोग्य अधिकारी आदी उपस्थित होते. सभेच्या सुरुवातीलाच सभागृहात सदस्य सभापती उपस्थित असताना अधिकारी वर्गाची उपस्थिती कमी दिसून आली. त्यामुळे आम्ही सदस्य आणि सभापती यांना वेळ जात नाही म्हणून सभेला येतो का अशा शब्दात नाराजी व्यक्त करत अधिकारी अनुपस्थिती का आहेत. त्यांनी रजेचा अर्ज दिला आहे का अस प्रश्नही सदस्य लॉरेन्स मान्येकर यांनी जिल्हा आरोग्य अधिकाऱ्यांना विचारला. यावर आरोग्य अधिकारी डॉ महेश खलीपे यांनी अनुपस्थित अधिकाऱ्यांना सभेत बोलवून घेत सभेचे कामकाज सुरू केले.

You cannot copy content of this page