मळेवाड येथे १५ रोजी माघी गणेश जयंती…

*💫सावंतवाडी दि.१०-:* मळेवाड जकात नाका येथील गणेश मंदिरात १५ फेब्रुवारी २०२१ रोजी माघी गणेश जयंती निमित्ताने शासनाचे कोविड-१९ नियमावलीचे पालन करून विविध धार्मिक कार्यक्रम होणार आहेत. या निमित्त सकाळी मंदिरात गणेश याग, आरती, तीर्थप्रसाद व दुपारी १ ते ३ वाजेपर्यंत महाप्रसाद होणार आहे. तसेच रात्री ८.३० वाजता चेंदवणकर दशावतार नाट्य मंडळाचा गजमुख विघ्नेश्वरा हा नाट्यप्रयोग होणार आहे. या नाट्यप्रयोगात दादू कोळंबकर, विष्णू नाईक, प्रथमेश खवणेकर, पंढरी घाटकर, सुधीर तांडेल, आनंद कोरगावकर, सुनील खोजुर्वेकर, पप्पू चव्हाण, नितीन फडके, रमेश साळगावकर, रमेश करंगुटकर आदी कलाकार आपली दशावतारी कला सादर करणार आहेत. त्यांना हार्मोनियम- आशिष तवटे, पखवाज-प्रमोद घावनळकर, तालरक्षक-विशाल राऊत संगीतसाथ करणार आहेत. तरी सर्वांनी कोविड-१९ नियमांचे पालन करून या सर्व कार्यक्रमांचा लाभ घेण्याचे आवाहन मंडळाने केले आहे.

You cannot copy content of this page