दशावतार प्रश्नमंजुषा स्पर्धेत तेजस्वी नळेकरचे यश…

*💫वेंगुर्ला दि.१०-:* तुळस येथील वेताळ प्रतिष्ठानतर्फे घेण्यात आलेल्या कोकणची लोककला दशावतार या प्रश्नमंजुशा स्पर्धेत वेंगुर्ले तालुक्यातील वजराट येथील तेजस्वी वासुदेव नळेकर हीने ४० पैकी ४० गुण संपादन करत उज्ज्वल यश संपादन केले. दशावताराविषयी लोकजागृती व्हावी या उद्देशाने ही स्पर्धा वेताळ प्रतिष्ठान तुळस, सिंधुदुर्ग यांनी आयोजित केली होती. स्पर्धेत यशस्वी झाल्याबद्दल तिला प्रमाणपत्र देऊन गौरविण्यात आले.

You cannot copy content of this page