सर्वोदय नगर येथील रस्त्याचे खडीकरण व डांबरीकरणाला सुरूवात…

माजी सभापती परिमल नाईक यांचा पाठपुरावा यशस्वी; नागरिकांनी मानले आभार…

सावंतवाडी ,ता.२९: येथील शिरोडा नाका सर्वोदयनगर मध्ये जाणाऱ्या रस्त्याचे खडीकरण व डांबरीकरणाला आजपासून सुरुवात झाली असून
त्यासाठी भाजपाचे माजी सभापती अँड परिमल नाईक यांनी पाठपुरावा केला.

यावेळी सर्वोदय नगर मध्ये जाणारा रस्ता हा खड्डेमय झाला होता. त्यामुळे येथील नागरिकांना मोठ्या प्रमाणात त्रासाला सामोरे जावे लागत होते. याबाबत परिमाल नाईक यांनी आपल्या सभापतीच्या कारकिर्दीत हा रस्ता खडीकरण व डांबरीकरण करण्यात यावा अशी मागणी येथील नागरिकांच्या वतीने नगर परिषदेत केली होती, अखेर आज या रस्त्याच्या डांबरीकरण व खडीकरणाला सुरुवात झाल्याने नागरिकांनी परिमाल नाईक यांचे आभार मानले आहेत

You cannot copy content of this page