मालवण-बेळणे रस्ता कामास अखेर सुरुवात

युवासेनेच्या रास्ता रोकोच्या इशाऱ्यानंतर कामास सुरुवात प्रत्यक्षात

⚡मालवण ता.२८-: मालवण बेळणे रस्त्याप्रश्नी युवासेनेने रास्ता रोको करण्याचा इशारा दिल्यानंतर या रस्त्याचे काम करणाऱ्या संबंधीत ठेकेदाराने अखेर आजपासून या रस्त्याच्या कामास प्रत्यक्षात सुरवात केली आहे.

मालवण बेळणे रस्त्याचे काम गेले दीड वर्ष रखडले होते. या रस्त्याच्या झालेल्या दुरवस्थेमुळे ग्रामस्थांचे, वाहन चालकांचे हाल होत होते. याप्रश्नी युवासेनेचे पदाधिकारी राहुल सावंत यांनी काही दिवसांपूर्वी या रस्त्याच्या कामास संबंधित ठेकेदाराने तत्काळ सुरुवात न केल्यास रास्ता रोको करण्याचा इशारा दिला होता. युवासेनेच्या या दणक्यानंतर संबंधित ठेकेदाराने आजपासून या रस्त्याच्या कामास सुरवात केली आहे.

दरम्यान संबंधित ठेकेदाराने केवळ खड्डे बुजवून काम थांबविल्यास रास्ता रोको आंदोलन छेडले जाईल असा इशारा श्री. सावंत यांनी संबंधित विभागाच्या उपअभियंत्यांना दिला आहे.

You cannot copy content of this page