⚡देवगड ता.२८-: महाराष्ट्र शासनाच्या सहकार्याने महाराष्ट्र ऑलिम्पिक असोसिएशन व क्रीडा युवक संचनालय पुणे यांच्या संयुक्त विद्यमाने,महाराष्ट्र राज्य ऑलिम्पिक क्रीडा स्पर्धा २०२२-२३ या स्पर्धेचे आयोजन दि.२ ते १२ जानेवारी २०२३ या कालावधीत श्री छत्रपती क्रीडा संकुल म्हाळुंगे बालेवाडी येथे तसेच दि.५ ते ८जाने.३०२३ या कालावधीत तायक्वांदो या स्पर्धा होणार आहेत.
या स्पर्धा यशस्वीतेसाठी महाराष्ट्र ऑलिम्पिक असोसिएशनचे महासचिव नामदेव शिरगावकर,अध्यक्ष अनिल झोडगे,महासचिव संदीप ओंबासे,बिईओ गफार पठाण,या सहकार्य लाभणार आहे.
सिंधुदुर्ग देवगड च्या सचिव राष्ट्रीय पंच श्रीमती शेवंता नाईक यांची पंच (रेफ्रि)नियुक्ती करण्यात आली आहे.त्यांना कोल्हापूर जिल्हा सचिव राष्ट्रीय पंच प्रभाकर कांबळे यांचे प्रोत्साहन व मार्गदर्शन लाभले आहे.देवगड अध्यक्ष विवेक नलावडे व अन्य सदस्यांनी शुभेच्छा व्यक्त केल्या आहेत.
