⚡मालवण ता.२८-: मालवण येथील बॅ. नाथ पै सेवांगण या संस्थेचा ४३ वा वर्धापन दिन तथा राष्ट्र सेवादलचा दलदिन सेवांगणमध्ये मोठ्या उत्साहात सपत्र झाला.
प्रारंभी राष्ट्र सेवादलचे ज्येष्ठ कार्यकर्ते आणि संस्थेचे सभासद साथी श्री. रमेश धुरी यांच्या शुभहस्ते राष्ट्र सेवा दलचा झेंडा फडकवून कार्यक्रमाचा शुभारंभ करण्यात आला. त्यानंतर नॅशनल स्किल डेव्हलपमेंट कार्पोरेशन भारत सरकार, युवा परिवर्तन आणि सेवांगणच्या संयुक्त विद्यमाने आयोजित करण्यात आलेल्या शिवणकला प्रशिक्षण वर्ग आणि नर्सिंग असिस्टंट प्रशिक्षण वर्गातील विद्यार्थ्यांचा निकाल जाहिर करण्यात आला. हे दोन्ही कोर्स सहा महिने कालावधीचे होते. उत्तीर्ण विद्यार्थ्यांना मान्यवरांच्या हस्ते प्रमाणपत्र वितरीत करण्यात आली. याप्रसंगी रमेश धुरी, संस्थेचे कार्यवाह श्री. लक्ष्मीकांत खोबरेकर, कोषाध्यक्ष श्री. रुजारिओ पिंटो, व्यवस्थापक श्री. संजय आचरेकर, युवा परिवर्तनचे प्रतिनिधी श्री. देव चव्हाण तसेच संस्थेचे सर्व कर्मचारी उपस्थितीत होते.
शिवणकला वर्गातील उत्तीर्ण विद्यार्थीनी कु. जान्हवी बोडये, कु. निकिता माळगांवकर, कु. हर्षदा मिठबांवकर, कु. भाग्यश्री मुसळे, कु. मिताली कांबळी, कु. एश्वर्या मणचेकर, सौ. निकिता वेंगुर्लेकर, सौ. सोनाली कांबळी, सौ. तरन्नुम पटेल, सौ. ऋचिता जोशी तसेच नर्सिंग कोर्स मधील उत्तीर्ण विद्यार्थीनी कु. गौरी मेस्त्री, कु. प्राची जोशी, कु. सुगंधी कांदळगांवकर, कु. शार्लेट फर्नांडीस, कु. क्लिटा फर्नांडीस, सौ. दिपिका कासवकर, सौ. रोशनी शिर्सेकर, कु. लतिका शिर्सेकर, सौ. सोनाली कोळंबकर, कु. ममता लुडबे, कु. संपदा मांजरेकर, कु. ममता मांजरेकर यांना शासनमान्य प्रमाणपत्रे देण्यात आली. याप्रसंगी श्री. लक्ष्मीकांत खोबरेकर, श्री. संजय आचरेकर यांनी उपस्थितीतांना राष्ट्र सेवा दल आणि सेवांगणचा इतिहास आणि आजवरच्या कार्याची माहिती दिली.
