आचरा कॉलेजच्या विद्यार्थ्यांना खासदार व आमदार यांच्याकडून प्रवास खर्चासाठी मदतीचा हात

⚡मालवण ता.२८-: भारताच्या प्रजासत्ताक दिनी म्हणजेच २६ जानेवारी रोजी दिल्लीच्या राजपथावरील कार्यक्रमासाठी आचरा कॉलेजच्या विद्यार्थ्यांची निवड झाल्यानंतर यातील सहभागी कलाकारांची दिल्लीवारी सुसह्य होण्याच्यादृष्टीने खासदार विनायक राऊत व आमदार वैभव नाईक यांनी पुढाकार घेत दिल्लीवारीच्या प्रवास खर्चासाठी खासदार राऊत व आमदार नाईक यांनी आर्थिक मदतीचा हात पुढे करून प्रत्येकी वीस हजार अशी रोख चाळीस हजार रुपयांची मदत केली आहे.

आचरा कॉलेजच्या विद्यार्थ्यांनी खासदार विनायक राऊत यांची भेट घेतली यावेळी त्यांच्या समवेत मालवण तालुका अध्यक्ष हरी खोबरेकर, मंदार केणी,मंदार ओरसकर आचरा कॉलेज लोकल कमिटी पदाधिकारी विदयानंद परब, रुपेश साटम, आचरा कॉलेजचे विद्यार्थी उपस्थित होते.

यावेळी खासदार राऊत म्हणाले कीं ग्रामिण भागातून असून सुद्धा ऑल इंडिया प्रतियोगीतेमध्ये, 225 संघातून निवड झाल्याबद्दल सर्व विद्यार्थ्यांचे तसेच नृत्यदिग्दर्शकांचे अभिनंदन केले यावेळी राऊत यांनी रुपये वीस हजार विमान प्रवासासाठी मदत म्हणून देत दिल्ली मध्ये या सर्व महाविदयालयीन विद्यार्थ्यांना संसद भवन, व इतर संसदेच्या इतर वास्तू शासनाचे सुरक्षा दाखवण्याची ग्वाही दिली आहे. तसेच आचरा पिपल्स असोसिएशन चे सर्व पदाधिकारी, सर्व स्थानिक पदाधिकारी यांचे संस्थेच्या प्रगतिशील वाटचालीसाठी शुभेच्छा देऊन सर्वांचे अभिनंदन ही केले.

यावेळी आमदार वैभवजी नाईक यांनी देखील सर्व विदयार्थांचे अभिनंदन केले रोख स्वरुपात आर्थिक मदत म्हणून रुपये वीस हजार देत विदयार्थ्यांनी अशा स्पर्धांमध्ये सहभाग घेऊन आपल्या शाळा कॉलेजचे तथा गावाचे नाव उज्वल करावे अशी अपेक्षा व्यक्त केली आहे

You cannot copy content of this page