भंडारी हायस्कूलच्या विद्यार्थ्यांनी प्रत्येक क्षेत्रात यश मिळवून प्रशाळेचे नाव उंचवावे

विजय पाटकर यांचे प्रतिपादन

⚡मालवण ता.२७-: भंडारी ए सो हायस्कूल व युनियर कॉलेजचे विद्यार्थी आज विविध क्षेत्रात कार्यरत आहेत. स्नेहमेळाव्याच्या निमित्ताने भंडारी हायस्कूलचे विद्यार्थी एकत्र येत असतात. स्नेहमेळाव्यातून विद्याथ्याचे शाळेवर असणारे प्रेम दिसून येते. भंडारी हायस्कूलचा विद्यार्थी प्रत्येक क्षेत्रात चमकावा हि आमची अपेक्षा आहे. त्यासाठी विद्याथ्याना आम्ही सर्व सोयी सुविधा देण्यासाठी कटीबद्ध आहोत. विद्याथ्यानी भंडारी हायस्कूलचे नाव उंचवावे असे प्रतिपादन भंडारी एज्युकेशन सोसायटीचे अध्यक्ष विजय पाटकर यानी येथे बोलताना केले

मालवण येथील भंडारी एज्युकेशन सोसा हायस्कूल आणि ज्युनिअर कॉलेजचे वार्षिक स्नेहसंमेलन व पारितोषिक वितरण समारंभ आज पार पडला यावेळी व्यासपीठावर प्रमुख पाहुणे म्हणून आयकर विभागाचे सेवानिवृत्त सहआयुक्त अविनाश हडकर, ऑनररी जनरल सेक्रेटरी साबाजी करलकर, जॉइंट सेक्रेटरी चंद्रकात मयेकर, लोकल कमिटीचे दशरथ कवटकर आर्किटेक्ट मधुकर चव्हाण, राजा देसाई, मुख्याध्यापक वामन खोत, माजी मुख्याध्यापिका सुप्रिया टिकम, विद्यार्थी प्रतिनिधी स्वप्नाली हळवे, शालेय मुख्यमंत्री सम्राट राजे, पर्यवेक्षक हणमंत तिवले, दशरथ कवटकर, प्रफुल्ल देसाई, संग्राम कासले, आरोंदेकर, आदि उपस्थित होते. कार्यक्रमाचे प्रास्ताविक मुख्याध्यापक वामन खोत यानी आपल्या प्रास्ताविकात विद्याथ्यानी कला, क्रिडा, स्पर्धा परीक्षा यामध्ये मिळवलेल्या यशाचा आढावा घेतला मान्यवरांचा परिचय श्री प्रफुल्ल देसाई यांनी करून दिला

यावेळी बोलताना संस्थेचे अध्यक्ष विजय पाटकर यांनी सिंधुदुर्ग जिल्हय़ाबरोबरच राज्यात भंडारी हायस्कूल व काfनष्ठ महाविद्यालयाच्या शैक्षणिक, सांस्कृतिक, क्रिडा या क्षेत्रातील कार्याचा गौरव होत आहे. हि संस्थेच्या दृष्टीने अभिमानाची बाब आहे. भंडारी हायस्कूलच्या विद्यार्थ्यांनी यापूढे ही स्पर्धात्मक परीक्षा, क्रिडा, सांस्कृतिक क्षेत्रात यश प्राप्त करायचे आहे असे सांगितले .

यावेळी भंडारी हायस्कूल माजी विद्यार्थी युवा संघटनेतर्फे दिला जाणारा स्व. रघुनाथ टेमकर स्मृती पुरस्कार सम्राट राजे या विद्यार्थ्यांला प्रमुख पाहुणे अविनाश हडकर यांच्याहस्ते प्रदान करण्यात आला सन्मानपत्र व रोख रूपये दोन हजार असे या पुरस्काराचे स्वरूप होते. तर कनिष्ठ महाविद्यालयाचा आदर्श विद्यार्थी पुरस्कार अमोल वासुदेव घाडी याला संस्थेचे अध्यक्ष विजय पाटकर यांच्या हस्ते प्रदान करण्यात आला. याप्रसंगी संस्थेचे उपाध्यक्ष श्री नि ल मिठबावकर यांच्या वतीने दिल्या जाणाऱ्या बेस्ट स्टुडंट पुरस्काराचे मान्यवराच्या हस्ते वितरण करण्यात आले. कार्यक्रमाचे सुत्रसंचालन प्रफुल्ल देसाई आणि सुनंदा वराडकर यानी केले तर आभार सहाय्यक शिक्षिका सौ ए. ए. वाईरकर यानी मानले.

You cannot copy content of this page