मायनिंग वाहतुकीवर नियंत्रण ठेवण्यासाठी उपाययोजना करा

वेंगुर्ला मनसे कडून निवेदनाद्वारे निरीक्षकांकडे मागणी; विविध मागण्यांचे निवेदन सादर

*💫सावंतवाडी दि.०९-:* जिल्ह्यात सुरू असलेल्या मयनिगची भरधाव वेगाने होणाऱ्या वाहतुकीवर नियंत्रण आणून त्यावर अंकुश आणण्यासाठी आज वेंगुर्ला मनसे कडून पोलिस निरीक्षकांना निवेदन देण्यात आले आहे. या निवेदनात मायनिग वाहतूक करणाऱ्या डंपरच्या वेगावर मर्यादा आणावी तसेच ताशी ४० किमीच्या वर गाडी आढळल्यास त्या गाडीवर कारवाई करावी अशी मागणी केली आहे. तसेच ड्रिंक अँड ड्राईव्ह वर देखील बंदी घालून आढळल्यास कारवाई करावी, परप्रांतीय मजुरांचे ओळखपत्र नोंद पोलिस स्टेशनला करणे बंधनकारक करावे, तसेच गाडीचे परवाने व कागदपत्रे यांची पडताळणी करावी. तसेच गाडीची ताडपत्री व्यवस्थित असणे व ती क्लिनिंग केलेली असणे बंधनकारक करावे. तसेच दोन डंपर मध्ये १०० मीटरचे अंतर असणे बंधनकारक करावे व डंपर ला ओव्हरटेक मारण्याचे कटक नियम करावेत अशी मागणी केली आहे. तसेच वाहतूक पोलिसांची मोबाईल व्हॅन कार्यरत असावी अशा विविध मागण्या करण्यात आल्या आहेत. यावेळी मनविसे जिल्हा अध्यक्ष कुणाल कीनळेकर , तालुका अध्यक्ष सनी बागकर , मनविसे तालुका अध्यक्ष महादेव तांडेल , तालुका सचिव आबा चिपकर , उप तालुकाध्यक्ष विशाल माडये, उपतालुकाध्यक्ष विनायक फटनाईक, शाखा अध्यक्ष सहदेव फोडनाईक व कार्यकर्ते उपस्थित होते .

You cannot copy content of this page