मोती तलावाच्या कठड्याच्या कामाला मिळाला मुहूर्त

मंत्री केसरकर यांनी केला शुभारंभ;एक कोटींचा होणार खर्च:सर्व पक्षियांची होती मागणी

सावंतवाडी ता.२५-: बहुचर्चित ठरलेल्या मोती तलावाच्या कठड्याच्या कामाला अखेर मुहूर्त मिळाला असून. आज शालेय शिक्षण मंत्री दीपक केसरकर यांच्या उपस्थितीत या कामाचा शुभारंभ करण्यात आले आहे. हे काम पूर्ण व्हावे यासाठी अनेक राजकीय पदाधिकाऱ्यांसह नागरिकांनी प्रयत्न केले होते. तसेच माजी नगराध्यक्ष बबन साळगावकर यांनी आंदोलन करण्याचा इशारा दिला होता. या कामासाठी तब्बल ५०-५० लाखाच्या अशा दोन निविदा काढण्यात आल्या आहेत. अंदाजे एक कोटी रुपयांचा खर्च या कामासाठी होणार आहे.

मध्यंतरीच्या काळात येथील मोती तलावात गाळ काढण्याची मोहीम राबविण्यात आली होती. परंतु चुकीच्या पद्धतीने कठड्याच्या बाजूने गाळ उपसा झाल्यामुळे “तो” कोसळला होता.

यावेळी शिंदे गटाचे तालुकाप्रमुख बबन राणे शहर प्रमुख बाबू कुडतरकर माजी नगरसेविका भारती मोरे माजी नगरसेविका दिपाली सावंत माजी नगरसेविका माधुरी वाडकर तानाजी वाडकर आधी शिंदे गटाचे कार्यकर्ते उपस्थित होते

You cannot copy content of this page