प्रज्ञा मोर्ये, वैष्णवी वाडकर वक्तृत्व स्पर्धेत प्रथम

नट वाचनालय स्पर्धेचा निकाल जाहीर

बांदा/प्रतिनिधी
येथील नट वाचनालयात (कै.) शांताराम कमळाजी नाडकर्णी व (कै.) शांताबाई शांताराम नाडकर्णी यांच्या स्मरणार्थ आयोजित करण्यात आलेल्या सावंतवाडी व दोडामार्ग तालुका मर्यादित शालेय वक्तृत्व स्पर्धेला उस्फुर्त प्रतिसाद मिळाला. पाचवी ते सातवी प्राथमिक गटात प्रज्ञा तुषार मोर्ये (खेमराज हायस्कुल, बांदा) तर आठवी ते दहावी या माध्यमिक गटात वैष्णवी अशोक वाडकर (नूतन माध्यमिक विद्यालय, इन्सुली) यांनी प्रथम क्रमांक मिळविला.
प्राथमिक गटात नैतिक निलेश मोरजकर (जिल्हा परिषद केंद्रशाळा, बांदा नंबर १), वेदांत संदीप सावंत (खेमराज हायस्कुल, बांदा) यांनी अनुक्रमे द्वितीय व तृतीय क्रमांक मिळविला. या गटात प्रणिता गोविंद सावंत (नूतन माध्यमिक विद्यालय, इन्सुली), सुस्मिता सुनील सावंत (नूतन माध्यमिक विद्यालय, इन्सुली) यांनी उत्तेजनार्थ क्रमांक मिळविला. माध्यमिक गटात ओम विजय परब (विलवडे हायस्कुल, विलवडे), हिमांशू अरुण रेडकर (खेमराज हायस्कुल, बांदा) यांनी अनुक्रमे द्वितीय व तृतीय क्रमांक मिळविला. या गटात गायत्री जयराम पालव (नूतन माध्यमिक विद्यालय, इन्सुली) हिला उत्तेजनार्थ क्रमांक देण्यात आला.
स्पर्धेचे परीक्षण चंद्रकांत सावंत व महाबळेश्वर सामंत यांनी केले. तत्पूर्वी स्पर्धेचे उदघाटन नूतन सरपंच प्रियांका नाईक यांच्या हस्ते दीपप्रज्वलन करून संपन्न झाले. पारितोषिकांचे वितरण नूतन ग्रामपंचायत सदस्य बाळू सावंत, जावेद खतीब, सदस्या रुपाली शिरसाट, श्रेया केसरकर, वाचनालयचे अध्यक्ष एस आर सावंत, सचिव राकेश केसरकर, सहसचिव हेमंत मोर्ये, परीक्षक चंद्रकांत सावंत, महाबळेश्वर सामंत, अंकुश माजगावकर, अनंत भाटे, संचालक निलेश मोरजकर, संचालिका स्वप्नीता सावंत, ग्रंथपाल प्रमिला नाईक-मोरजकर, सुनील नातू, अमिता परब यांच्या उपस्थितीत करण्यात आले. यावेळी शिक्षिका रीना मोरजकर, चित्रलेखा नाईक, श्वेता मोर्ये, तुषार मोर्ये, प्रवीण परब आदी उपस्थित होते. आभार राकेश केसरकर यांनी मानले.
फोटो :-
बांदा नट वाचनालयात आयोजित वक्तृत्व स्पर्धेतील विजेत्या स्पर्धेकांसोबत उपस्थित असलेले मान्यवर.

You cannot copy content of this page