विजयाच्या किंग मेकर विभागीय अध्यक्ष अर्चना घारे परब
⚡सावंतवाडी ता.२०-: तालुक्यामध्ये राष्ट्रवादी काँग्रेसने ग्रामपंचायत निवडणुकीत अपेक्षित यश संपादन केले असून तिरोडा ग्रामपंचायतीसह बऱ्याच ग्रामपंचायतीमध्ये सदस्य पदी उमेदवार निवडून तालुक्यातील आपली ताकद सिद्ध केली आहे
एकूणच साहेबांची शिवसेनेपेक्षा राष्ट्रवादी काँग्रेस उजवी ठरली आहे एकूणच या यशात राष्ट्रवादीच्या नेत्या अर्चना घारे परब किंगमेकर ठरल्या आहेत.
सावंतवाडी तालुक्यात एकूण 52 ग्रामपंचायतीच्या निवडणुकीमध्ये राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाने उडी टाकली होती. यामध्ये चराठा, भालावल, नेमळे, कास, तिरोडा,माडखोल, निगुडे आदी ग्रामपंचायतीमध्ये खाते खोलले आहे, तिरोडा ग्रामपंचायतवर माजी राज्यमंत्री प्रवीण भोसले यांच्या सहकार्याने राष्ट्रवादीने सत्ता काबिज केली आहे.
सावंतवाडी तालुक्यातील दीपक केसरकर यांचे वर्चस्व लक्षात घेता या ठिकाणी बाळासाहेबांच्या शिवसेनेला सरळ सरळ अपयश आले आहे त्यामानाने राष्ट्रवादीने तालुक्यात सरशी केली आहे राष्ट्रवादीच्या या देशामध्ये कोकण विभागीय अध्यक्ष अर्चना झाले परत यांची मेहनत आणि कार्यकर्त्यांची तळमळ यशाला आली. येथील तहसील कार्यालयाच्या परिसरात विजय संपादन केल्यानंतर विजयी उमेदवारासह राष्ट्रवादीने जोरदार जल्लोष केला.
