पाडलोसमध्ये शिवसेनेचा गड आला पण सिंह गेला!

सरपंचपदी सलोनी पेडणेकर यांच्यासह पाच सदस्य विजयी : तर भाजपचे दोन सदस्य विजयी

⚡बांदा ता.२०-: पाडलोस ग्रामपंचायत निवडणुकीत शिवसेनेच्या सरपंच सलोनी सतीश पेडणेकर यांच्यासह पाच सदस्य तर भाजपचे दोन सदस्य बहुमतांनी विजयी झाले आहेत. परंतु युवासेना मळेवाड विभागप्रमुख समीर(इटो) नाईक यांचा पराभव झाल्याने पाडलोस मध्ये शिवसेनेसाठी गड आला पण सिंह गेला असे म्हटल्यास वावगे ठरणार नाही. शिवसेना उद्धव ठाकरे गटाचे वर्चस्व कायम राहिले.

You cannot copy content of this page