⚡वेंगुर्ला ता.१९-: वेतोरे येथील सातेरी मंदिर येथे देवदर्शनासाठी आलेल्या सावंतवाडी येथील निखिल सावंत यांचे मंदिर परिसरात पडलेले पाकीट डॉ. राधाकृष्ण वेतोरकर यांनी सात हजार रोख रक्कम व महत्त्वाच्या कागदपत्रांसह प्रामाणिकपणे सातेरी मंदिरात मध्ये पाकीट मालकाला सुपुर्द केले.
सावंतवाडी येथील निखिल सावंत हे वेतोरे येथील सातेरी मंदिर येथे देवदर्शनासाठी आले असता त्यांची रोख रक्कम सात हजार रुपये व महत्त्वाच्या कागदपत्रांसह मंदिर परिसरात पाकीट पडले. हे पाकीट येथे आलेले डॉ.राधाकृष्ण वेतोरकर यांना सापडले असता, त्या पाकीटात असलेल्या कागदपत्रांच्या आधारे पाकीट मालकाशी संफ करुन पाकीटामध्ये असलेली सात हजार रोख रक्कम व महत्त्वाच्या कागदपत्रांसह वेतोरे येथील सातेरी मंदिर येथे पाकीट मालक निखिल सावंत यांच्या ताब्यात देण्यात आले. त्यामुळे डॉ.राधाकृष्ण वेतोरकर यांच्या प्रामाणिकपणाचे वेतोरे पंचक्रोशीतील कौतुक केले जात आहे.
