श्री नवनितानंद महाराजांचे सातारा येथे अपघाती निधन

कल्याण येथे पार्थिव ठेवण्यात येणार आहे दर्शनासाठी;सिंधुदुर्गातील असंख्य अनुयायी कल्याणच्या दिशेने रवाना

⚡बांदा ता.१९-: मुंबईसह सिंधुदुर्ग, रत्नागिरी रायगड जिल्ह्यात श्री स्वामी समर्थ मठाची स्थापना करणारे व राज्यभरात लाखो अनुयायी असलेले श्री नवनीतानंद महाराज (मोडक महाराज) यांचे आज पहाटे पुणे -सातारा महामार्गावर सातारा शहरानजिक अपघातात निधन झाले.

त्यांची सुमो गाडी दुभाजकाला धडकल्याने त्यांना गंभीर दुखापत झाली. चालक अत्यवस्थ असून त्यांचेवर मुंबई येथे उपचार सुरु आहेत. महाराजांचे पार्थिव कल्याण येथील श्री स्वामी समर्थ मठात अंत्यदर्शनासाठी ठेवण्यात येणार आहे. त्यांचे भक्तगण शोकसागरात बुडाले असून लाखो अनुयायी कल्याण येथे जाण्यासाठी रवाना झाले आहेत. सिंधुदुर्ग जिल्ह्यात त्यांनी डिंगणे, तुळस, कलंबिस्त, देवगड येथे मठाची स्थापना केली होती. दर महिन्यात ते एकदा याठिकाणी येऊन भक्तांना मार्गदर्शन करत. सिंधुदुर्ग जिल्ह्यातून भक्तगणं कल्याण येथे जाण्यासाठी रवाना झाले आहेत.

You cannot copy content of this page