फ्रान्स की अर्जेंटिना

फिफा विश्वचषक फुटबॉल अंतिम सामन्याला थोड्याच वेळात;निकालाकडे फुटबॉल प्रेमींचे लक्ष:तिसऱ्या वेळी बाजी कोण मारणार ?

⚡सिंधुदुर्ग दि.१८-: फिफा विश्वचषक फुटबॉल स्पर्धेचा महाअंतिम सामना थोड्याच वेळात खेळला जाणार आहे. यात अर्जेटिना की फ्रान्स कोण पटकावणार विश्वविजेतेपद याकडे साऱ्या फुटबॉलप्रेमींसह जगाच लक्ष लागले आहे. फ्रान्स आणि अर्जेटिना हे दोनही संघ तिसऱ्यांदा विश्वचषक जिंकण्याचा प्रयत्नात आहेत. फ्रान्सने १९९८ आणि २०१८मध्ये, तर अर्जेटिनाने १९७८ आणि १९८६मध्ये विश्वचषकावर आपले नाव कोरले होते.

फ्रान्सच्या संघाने गेल्या दशकभरात फुटबॉल विश्वावर वर्चस्व गाजवले आहे. दिदिएर डेशॉम्प यांच्या मार्गदर्शनाखाली फ्रान्सने गतविश्वचषकाचे जेतेपद मिळवले होते. आता १९६२ नंतर सलग दोन विश्वचषक जिंकणारा पहिला संघ ठरण्याचीही फ्रान्सला संधी आहे. यंदाच्या विश्वचषकात सर्वाधिक गोल करणाऱ्या खेळाडूंच्या यादीत मेसी पुढे आहे.

You cannot copy content of this page