⚡मालवण ता.१८-: प्रतिवर्षाप्रमाणे वायरीबांध मालवण येथे सोमवार दि. १९ डिसेंबर (सफला एकादशी) रोजी परमपूज्य श्री सद्गुरु सदानंद माऊली महाराज ध्यानमंदिरचा ७ वा वर्धापनदिन श्री. विलास झाड यांच्या उपस्थितीत साजरा करण्यात येणार आहे. यानिमित्त सकाळी ८ वा. प.पू.श्री गुरुमाऊलींच्या निर्गुण पादुकांवर लघुरुद्राभिषेक, दुपारी १२.३० वा. मध्यान्न आरती, दुपारी १ वा. महाप्रसाद आणि रात्रौ. ८ वा. सांप्रदायिक भजन होणार आहे.
तरी सर्वांनीउपस्थित राहून श्रींच्या दर्शनाचा आणि महाप्रसादाचा लाभ घ्यावा, असे आवाहन सांप्रदायाचे कार्याध्यक्ष श्री. कृष्णा बांदेकर आणि समस्त भक्त-शिष्य वृंदातर्फे करण्यात आले आहे.
