⚡सिंधुदुर्गनगरी ता.१८-: राष्ट्रीय आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरण व राज्य आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरणाच्यावतीने उद्या सोमवार दि. १९ डिसेंबररोजी कुडाळ येथील आर एस एन हाॕटेल येथे ‘आपदा मित्र’ प्रशिक्षण कार्यक्रमाचे उद्घाटन सकाळी ११-३० वा. जिल्हाधिकारी के. मंजुलक्ष्मी यांच्या हस्ते होणार आहे. अशी माहिती निवासी उपजिल्हाधिकारी तथा जिल्हा आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरणाचे मुख्य कार्यकारी अधिकारी डाॕ. जयकृष्ण फड यांनी दिली.
१९ ते ३० डिसेंबरपर्यंत चालणाऱ्या या प्रशिक्षण कार्यक्रमात २०० स्वयंसेवकांना ‘आपदा मित्र’ चे प्रशिक्षण देण्यात येणार आहे. पैकी १०० जणांच्या पहिल्या तुकडीचे प्रशिक्षण उद्यापासून सुरु होणार आहे.
