विनोद तावडे यांचे बांदा येथे भाजपच्यावतीने स्वागत…

*💫बांदा दि.०७-:* माजी शिक्षणमंत्री तथा भाजपचे नेते विनोद तावडे यांचे बांदा येथे भाजपच्या पदाधिकाऱ्यांनी पुष्पगुच्छ देऊन स्वागत केले. विनोद तावडे हे पडवे येथे राज्यसभा खासदार नारायण राणे यांच्या हॉस्पिटलच्या उद्घाटन कार्यक्रमासाठी गोव्यातून सिंधुदुर्ग जिल्ह्यात सकाळी आलेत. बांदा येथे भाजप पदाधिकारी व कार्यकर्ते यांनी स्वागत केले. यावेळी सरपंच अक्रम खान, उपसभापती शीतल राऊळ, शहर अध्यक्ष राजा सावंत, माजी सरपंच मंदार कल्याणकर, बाळा आकेरकर, सुनील धामापूरकर, योगेश धोंगडे, दिलीप कोरगावकर, मिलिंद सावंत, भाई म्हाडगुत, राकेश गावडे आदी उपस्थित होते.

You cannot copy content of this page