सिंधुदुर्ग किल्ला प्लास्टिक मुक्ती अभियानास उत्स्फूर्त प्रतिसाद

*किल्ल्याच्या संरक्षण व संवर्धन यासाठी पुरातत्व खाते व शासनाला जिल्ह्यातील जनतेने करावे मेल; शिवप्रेमींचे आवाहन

*💫कुडाळ दि.०७-:* सिंधुदुर्ग शिवप्रेमी व समविचारी संघटना यांच्या संयुक्त विद्यमाने आज रविवार ७ फेब्रुवारी रोजी ऐतिहासिक सिंधुदुर्ग किल्ल्यावर प्लास्टिक मुक्ती अभियान राबविण्यात आले होते. या अभियानात जिल्ह्यातील विविध शिवप्रेमी संघटनांनी मोठ्या प्रमाणात सहभाग दर्शवला होता. या अभियानात महिलांनी मोठ्या प्रमाणात सहभाग दर्शवला होता. यावेळी किल्ल्यावर आलेल्या पर्यटकांनी देखील शिवप्रेमी सोबत स्वयंस्फूर्तीने सहभाग नोंदवत किल्ला प्लास्टिक मुक्त करण्यास सहकार्य केले होते. यावेळी सिंधुदुर्ग किल्ल्यावर प्लास्टिक कचऱ्याचे साम्राज्य पुन्हा येऊ नये त्यासाठी योग्य कारवाई करावी अशी मागणी शिवप्रेमींनी केली आहे. तसेच किल्ल्याच्या अस्तित्वाला धोका पोहोचवणारी झाडी हटवावी व किल्ल्याला पुनर्वैभव प्राप्त करून द्यावे असे आवाहन शिवप्रेमींनी पुरातत्व विभाग व शासनाकडे केली आहे. जिल्ह्याला ऐतिहासिक महत्त्व प्राप्त करून देणारा सिंधुदुर्ग किल्ल्याच्या संरक्षण व संवर्धनासाठी पुरातत्व खाते व शासनाकडे जिल्ह्यातील जनतेने मेल द्वारे मागणी करावी असे आवाहन शिवप्रेमी कडून करण्यात आले आहे.

You cannot copy content of this page