प्रकृतीची केली विचारपूस
*💫कणकवली दि.०७-:* केंद्रीय आयुष्य मंत्री श्रीपाद नाईक यांची भेट घेत महाराष्ट्र भाजपा प्रदेश चिटणीस प्रमोद जठार यांनी प्रकृतीची विचारपूस केली.केंद्रीय आयुष मंत्री श्रीपाद नाईक यांच्या कारला कर्नाटक राज्यात झालेल्या अपघातात नाईक यांची पत्नी मृत झाली होती तर श्रीपाद नाईक हे गंभीर जखमी झाले होते. केंद्रीय आयुषमंत्री श्रीपाद नाईक यांच्यावर गोव्यातील इस्पितळात उपचार सुरू आहेत. महाराष्ट्र भाजपा प्रदेश चिटणीस तथा माजी आमदार प्रमोद जठार यांनी मंत्री नाईक यांची गोवा येथे जात भेट घेतली. त्यांच्या तब्बेतीची विचारपूस करत लवकर बरे व्हा आणि पुन्हा देशसेवेत सक्रिय व्हा अशा सदिच्छा दिल्या. यावेळी सिंधुदुर्ग भाजपा जिल्हा प्रसिद्धिप्रमुख चंद्रहास उर्फ बबलू सावंत, प्रसाद जाधव आदी उपस्थित होते.
