महाराष्ट्रातील नवोपक्रमशील शिक्षकामध्ये दिग्विजय फडके यांची निवड…

*💫दोडामार्ग दि.०७ सुमित दळवी-:* महाराष्ट्र राज्य शैक्षणिक संशोधन व प्रशिक्षण परिषद पुणे संशोधन विभागामार्फत सन २०२०-२१ या वर्षी प्राथमिक शिक्षक व मुख्याध्यापक गटात राज्य स्तरीय नवोपक्रम स्पर्धा आयोजित केली होती या राज्य स्तरीय नवोपक्रम स्पर्धेत श्री सातेरी जि.प.केंद्रशाळा साटेली भेडशी ता दोडामार्ग जि सिंधुदुर्ग या शाळेत उपशिक्षक म्हणून कार्यरत असलेल्या श्री दिग्विजय नागोजी फडके यांनी सादर केलेल्या नवोपक्रमाला राज्य स्तरावर यश प्राप्त झाले असून महाराष्ट्रातील निवडक दहा नवोपक्रमामध्ये निवड झाली आहे. या राज्य स्तरीय स्पर्धेत प्रथम जिल्ह्यातून ३६ नवोपक्रमातून ७ नवोपक्रम निवडले गेले या मध्ये श्री फडके यांचा चौथा क्रमांक नंतर या ७ नवोपक्रमाचे ऑनलाईन कार्यशाळा घेऊन सादरीकरण घेण्यात आले यातून जिल्हयात उत्कृष्ट ५ नवोपक्रम निवडले त्यात तिसरा क्रमांक आला हे ५ नवोपक्रम राज्य स्तरावर मूल्यांकनासाठी पाठविले राज्यातील ३६ जिल्ह्यातून १४० नवोपक्रमातून राज्यात उत्कृष्ट १० नवोपक्रम निवडले त्या नवोपक्रमामध्ये श्री दिग्विजय फडके यांचा प्रथम फेरीत राज्यात प्रथम क्रमांक आला. श्री दिग्विजय फडके यांनी *Enrichment of English in rural areas students through English Apps* हा नवोपक्रम शाळेत राबविला व हा नवोपक्रम स्पर्धेसाठी सादर केला.जिल्हा परिषद शाळेत येणारी मुले ही ग्रामीण भागातून व खेड्यापाड्यातून आलेली असतात.त्यांच्या घरी कोणतेही इंग्रजीचे वातावरण नसते शिवाय मुलाना आजकाल मोबाईलवरील वेगवेगळया apps ची माहिती आहे आणि मुलांना मुळातच भाषिक खेळ खेळायला आवडते. हा धागा पकडून मुलांना इंग्रजीचे apps देऊन apps च्या माध्यमा तून वेगवेगळे इंग्रजी भाषिक खेळ खेळणे , इंग्रजी विषयीची भीती दूर करणे,इंग्रजीतील मूलभूत भाषिक कौशल्याचा विकास करणे, एकंदरीत इंग्रजीचे वाढते महत्व लक्षात घेऊन इंग्रजीची आवड निर्माण करून इंग्रजीचे समृद्धिकरण करणे हे उद्दात हेतू समोर ठेऊन राबविलेल्या या नवोपक्रमाला राज्य स्तरावर यश प्राप्त केले आहे.जिल्ह्यातील उपक्रमशील शाळा म्हणून शाळेला जर्मन देशातील शिक्षक व तंत्रज्ञ भेट द्यायला आले त्यावेळी शाळेतील मुलांनी त्यांच्याशी इंग्रजीतून संवाद साधला होता.त्यांनीही शाळेतील उपक्रमाचे कौतुक करत मुलांना प्रोत्साहित केले. श्री दिग्विजय फडके हे एक उपक्रमशील शिक्षक म्हणुन परिचित आहेत जिल्हा व राज्य स्तरीय विविध स्पर्धेत त्यांनी उज्ज्वल यश मिळवले आहे त्यामुळे त्यांचे सर्व स्तरातून कौतुक होत आहे.यासाठी त्यांना सिंधुदुर्ग डाएट चे प्राचार्य प्रकाश जाधव साहेब ,संशोधन विभाग प्रमुख श्री लवू आचरेकर सर ,अधिव्याखाता श्री गावडे सर , गट शिक्षण अधिकारी श्री शोभराज शेर्लेकर शिक्षण विस्तार अधिकारी श्रीम. छाया बाळेकुंद्री मॅडम, साटेली भेडशी केंद्र प्रमुख श्री सूर्यकांत नाईक मुख्याध्यापिका श्रीम पूनम पालव व शाळेतील सर्व शिक्षक दीपक दळवी,श्रीम.संपदा दळवी ,श्रीम.संजीवनी आवडण या सर्वांचे सहकार्य लाभले.

You cannot copy content of this page