मालवण-: मालवण तालुक्यात शनिवारी कोरोनाचे चार रुग्ण सापडून आले असून यात शहरातील एकाच कुटुंबातील तीन रुग्ण असून ग्रामीण भागात एक रुग्ण सापडला आहे. मालवण ग्रामीण रुग्णालयाच्या वतीने शनिवारी ९ व्यक्तींची कोरोना रॅपिड अँटिजेन तपासणी करण्यात आली. यात ९ पैकी ४ व्यक्तींचे तपासणी अहवाल पॉझिटिव्ह आले आहेत. यात शहरातील एकाच कुटुंबातील तीन व्यक्तींचा समावेश आहे. तर तारकर्ली येथील एका व्यक्तीचा तपासणी अहवाल पॉझिटिव्ह आला आहे, अशी माहिती मालवण ग्रामीण रुग्णालयाच्या वतीने देण्यात आली आहे.
*मालवण तालुक्यात आज सापडले चार कोरोना पॉझिटिव्ह रुग्ण
