उमेदवारी अर्ज ऑफलाईन स्वीकारा

ठाकरे सेना तालुका प्रमुख हरी खोबरेकर यांची मागणी

मालवण दि प्रतिनिधी
ग्रामपंचायत निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर उमेदवारी अर्ज ऑनलाईन भरणा प्रक्रिया सुरू असून २ डिसेंबर ही अर्ज भरण्याची अंतिम मुदत आहे. मोठ्या संख्येने ग्रामपंचायत निवडणुका असल्याने उमेदवार संख्याही जास्त आहे.

अर्ज भरणा प्रक्रिया सर्वत्र सुरू आहेत. मात्र सर्वर डाऊन ही समस्या सतत येत असल्याने अनेक उमेदवारांना अर्ज भरणा करताना अडचणी येत आहेत. २ डिसेंबर अर्ज भरणा करण्याची अंतिम मुदत पाहता अनेक उमेदवारांचे ऑनलाईन अर्ज भरणा करण्याची प्रक्रिया अपूर्ण राहण्याची शक्यता आहे. या सर्व बाबींचा विचार करता उमेदवारांचे अर्ज ऑफलाईन स्वीकारावेत. अशी मागणी शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे ) मालवण तालुकाप्रमुख हरी खोबरेकर यांनी केली आहे.

You cannot copy content of this page