निमित्त अर्चना घारे परब यांच्या वाढदिवसाचे
सावंतवाडी ता.०१-: शहरातील यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठान तर्फे सुरू करण्यात आलेल्या कौन्सिलिंग सेंटरच्या ठिकाणी अर्चना घारे परब यांचा वाढदिवस साजरा करण्यात आला या ठिकाणी जिल्हा ग्रामीण विकास यंत्रणे अंतर्गत प्रगती स्वयंसहायता महिला बचत गट पणदुर संचलित फिरते फूड व्हॅन चा शुभारंभ अर्चना घारे परब यांच्या हस्ते फीत कापून झाला.
या व्हॅन मध्ये स्नॅक्स कोल्ड्रिंक्स नाष्टा पार्टी ऑर्डर साठी लागणारे भोजन मिळणार असून सिंधुदुर्ग जिल्ह्यात सर्वत्र ही फूड व्हॅन फिरणार आहे त्या ठिकाणी विविध कार्यक्रमाचे आयोजन केले जाते त्या ठिकाणी ही व्हॅन सेवा पुरवणार आहे या व्हॅन शुभारंभ प्रसंगी प्रगती महिला बचत गटाच्या राजश्री कुबल मानसी मोरजकर मंजिरी म्हापणकर मीनल नवार श्रद्धा कुबल तसेच दीपक कुबल मुकुंद म्हापणकर वेदांत कुबल आदी उपस्थित होते
