इन्सुली चेकपोस्ट लोखंडी बँरीगेट्स धडक बसून दुचाकीची धडक

दुचाकीस्वाराच्या डोक्याला गंभीर दुखापत

बांदा /प्रतिनिधी
मुंबई गोवा महामार्गावर इन्सुली येथील पोलीस तपासणी नाक्यावर लावण्यात आलेल्या लोखंडी बॅरिगेड्सला बांद्याहून सावंतवाडीच्या दिशेने जाणाऱ्या दुचाकीस्वाराची जोरदार धडक बसली. ही धडक एवढी मोठी होती की यात दुचाकीस्वाराच्या डोक्याला गंभीर दुखापत झाली.
तपासणी नाक्यावर कार्यरत असलेल्या पोलीस कर्मचाऱ्यांनी रुग्णवाहिका बोलावून जखमीस बांदा प्राथमिक आरोग्य केंद्रात हलविले. जखमीवर उपचार करून अधिक उपचारासाठी अन्य ठिकाणी हलविण्यात आले. विशेष म्हणजे दुचाकीची बॅरिगेड्सला धडक बसल्या नंतर गाडीची डिकी उघडली आणि त्यातून दारूच्या बाटल्या रस्त्यावर विखुरल्या होत्या.

You cannot copy content of this page