मालवण तालुक्यात ग्रा.पं. निवडणुकीसाठी २७ अर्ज दाखल

⚡मालवण ता.३०-: मालवण तालुक्यातील ५५ ग्रामपंचायतींची निवडणुक होत असून सध्या सदस्य व सरपंच पदासाठी उमेदवारी अर्ज दाखल करण्यासाठी उमेदवारांमध्ये लगबग दिसून येत आहे. अर्ज ऑनलाइन पद्धतीने भरायवाचे असून नेटवर्कच्या अडचणींमुळे उमेदवारांना अर्ज भरण्यास अडचणी येत आहेत. मालवण तालुक्यातून आता पर्यंत विविध ग्रामपंचायतीसाठी सरपंच पदाचे ६ अर्ज तर सदस्य पदासाठी २१ अर्ज असे एकूण २७ उमेदवारी अर्ज दाखल झाल्याची माहिती तहसील प्रशासनाने दिली आहे.

मालवण तालुक्यात ग्रामपंचायत निवडणुकीसाठी उमेदवारी अर्ज भरण्याच्या पहिल्या दिवशी एकही अर्ज भरण्यात आला नव्हता. तर काल दुसऱ्या दिवशी १० अर्ज तर आज १७ अर्ज भरण्यात आले आहेत. यामध्ये आतापर्यंत सरपंच पदासाठी एकूण ६ अर्ज भरले गेले असून यात महान – २, आमडोस १, देवबाग १, नांदोस १ व वायरी १ असे अर्ज भरले गेले आहेत. तर महान, सुकळवाड, तळगाव, धामापूर, देवबाग, तारकर्ली या ग्रामपंचायतींच्या सदस्य पदासाठी एकूण २१ अर्ज भरले गेले आहेत.

उमेदवारी अर्ज दाखल करण्याची शेवटची तारीख २ डिसेंबर असून उमेदवारांची लगबग वाढली आहे. अर्ज ऑनलाइन भरावयाचे आहेत. मात्र, नेटवर्क च्या समस्येने उमेदवारांना अनेक अडचणी जाणवत आहेत.

You cannot copy content of this page